Coronavirus 
देश

corona virus update;रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर; रुग्णांची संख्या घटली 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. तसेच या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. दररोज सापडणाऱ्या कोरोनाबाधितांपेक्षा यातून बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 78.64 लाख झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात भारतात 50,129 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तर शनिवारी विषाणूमुळे 578 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 1,18,534 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

'माझा विवाहसंस्थेवर नाही विश्वास, व्हिसा मिळवण्यासाठी केले लग्न' 

गेल्या 24 तासात 62,077 लोकांनी विषाणूवर यशस्वीपणे मात केली आहे. कोरोना आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या 70,78,123 इतकी झाली आहे, समाधानाची बाब म्हणजे दररोज कोरोनाग्रस्तांपेक्षा कोरोनामुक्त जास्त होत आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 6,68,154 आहे. 

देशातील कोरोना रिकव्हरी रेट 89.99 टक्के झाला आहे, तर सक्रिय रुग्ण 8.49 टक्के आहेत. मृत्यू दर 1.05 टक्के झाला आहे. पॉझिटिव्हिटी रेट म्हणजे दररोज होणाऱ्या चाचण्यांपैकी सापडणारे कोरोनाबाधित रुग्ण 4.39 टक्के आहेत. भारताचा रिकव्हरी रेट इतर अनेक देशांच्या तुलनेत खूप जास्त आहे. गेल्या 24 तासाच देशात 11,40,905 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या कोविड-19 चाचण्यांची संख्या 10 कोटींच्या पुढे गेली आहे. देशात 10,25,23,469 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT